
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा कोरोनाचा रिपोर्ट प़ॉझिटिव्ह आला आहे. सिंह यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
Congress leader Digvijaya Singh tests positive for #COVID19. He tweets that he is in quarantine at his residence in Delhi. pic.twitter.com/8TeOUgidiX
— ANI (@ANI) April 16, 2021
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला व शिरोमनी अकाली दलाची नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमतकौर यांचाही कोरोनाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.
टेस्ट करण्याआधीच मोबाईवर आलेला ‘कलेक्टेड’चा मेसेज
दिग्विजय सिंह हे काल त्यांची कोरोना टेस्ट करणार होते, मात्र सँपल देण्याआधीच त्यांना एक मेसेज आला, ज्यामध्ये लिहिले होते की ‘तुमचं सँपल कलेक्ट करण्यात आले आहे.’ त्यावर दिग्विजय यांनी ट्विटरवरून प्रश्न उपस्थित केला आहे. दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटलं, ‘हे काय सुरू आहे? 10:02 झाले आहेत आणि मी RTPCR सँपल दिलेलं नाही. सँपल गोळा करण्यास अजून कुणी आलेलं नाही. तरी मला 9:39 वाजता संदेश आला आहे की, सँपल घेतलं आहे आणि आरएमएला पाठवण्यात आलं आहे. मला कळत नाही हे काय सुरू आहे?’

























































