विधानसभेपूर्वी काँग्रेसला धक्का, आमदार निर्मला गावित यांचा राजीनामा

1113

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्माला गावित यांनी राजीनामा दिला आहे. गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागड़े यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्या कोणत्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

निर्मला गावित या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. गावित कुटुंबीय हे गांधी घराण्याचे कट्टर समर्थक मानले जाते. नेहरू, इंदिरा गांधींपासून ते सोनिया आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्व गांधी कुटुंबाशी गावित यांचा स्नेह आहे. मात्र गावित कुटुंबियांमध्ये फूट पडल्याचे चित्र असून निर्मला गावित यांचे बंधू आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी गेल्या महिन्यातच भाजपामध्ये प्रवेश केला होता. भावापाठोपाठ आता निर्मला गावित यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या