
काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून त्यांना कामात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली आहे. मंत्री सहकार्य करत नसल्यामुळे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार नाहीत किंवा कामे पूर्ण करणार नाहीत, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.
गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी लिहिलं आहे की, ‘आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत’.
मंत्र्यांपर्यंत पोहोचणं मुश्कील होत असल्याचं सांगत त्यांनी सांगितलं की त्यांना कामाशी संबंधित माहिती देण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीशी संपर्क साधावा लागतो.
त्यामुळे लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण होत नाहीत. जेव्हा आम्हाला प्रकल्पांसाठी निधीची चर्चा करायची असते तेव्हा मंत्री तिसऱ्या व्यक्तीद्वारे संदेश पाठवतात. स्थानिक आमदार असतानाही आम्हाला आमच्या कामासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे जावं लागत असल्यानं आम्ही निराश आहोत, असं त्यांनी लिहिलं आहे.
अधिकाऱ्यांच्या बदलीच्या शिफारशींची गांभीर्यानं दखल घेतली जात नसल्याचंही आमदारांनी नमूद केलं.
‘अधिकार्यांच्या बदल्यांसाठी आमच्या शिफारस पत्रांचा विचार केला जात नाही. कोणीही अधिकारी आमचं ऐकत नाही’, असा तक्रारीचा सूर या पत्रात पाहायला मिळतो.
मुख्यमंत्र्यांनी तातडीनं यात हस्तक्षेप करावा अशी विनंती करून ते म्हणतात की, ‘आम्ही तुम्हाला त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती करतो’.


























































