सीडीएस नियुक्तीचे दुष्परिणाम वेळ आल्यावर कळतील- काँग्रेस

590

देशातील तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपीन रावत यांची नियुक्ती करण्यावर काँग्रेसने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने हे चुकीचे पाऊल उचलले आहे. वेळ आल्यावर या निर्णयाचे दुष्परिणाम कळतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी मंगळवारी दिली.

सीडीएस नियुक्तीवर नाराजी व्यक्त करीत तिवारी यांनी ट्विट केले. अत्यंत खेद आणि पूर्ण जबाबदारीने मी बोलतो की, सीडीएस नियुक्तीबाबत सरकारने अत्यंत चुकीचे पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे दुष्परिणाम वेळ आल्यावर समोर येतील, असे तिवारी यांनी नमूद केले. सीडीएस नियुक्ती प्रक्रिया इतकी किचकट आणि अस्पष्ट का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संरक्षणमंत्र्यांचे प्रधान सैन्य सल्लागार यांची नेमणूक केल्यानंतर सीडीएसकडून सरकारला दिल्या जाणाऱया सूचनांवर काय परिणाम होईल? सीडीएसचा सल्ला तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्त्वाचा असेल का? असे विविध प्रश्न करीत तिवारी यांनी सीडीएस नियुक्तीवर आक्षेप नोंदवला.

आपली प्रतिक्रिया द्या