मोदी एवढे घाबरतात का? राहुल गांधी यांचा पुन्हा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक अतिशय साधी गोष्ट आहे. अदानींच्या शेल कंपन्यांमधील 20 हजार कोटी रुपयांची मालकी कोणाकडे आहे. त्या ‘बेनामी’ रकमेचा मालक कोण? प्रधानमंत्री जी, आखिर इतना डर क्यों, असे म्हणत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे.

कॉँग्रेसकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत पत्रकारांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला असता त्यांनी अदानींच्या शेल कंपन्यांमधील बेनामी गुंतवणुकीबाबत प्रश्न उपस्थित केला.

यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट करत अदानींच्या शेल कंपन्यांमधील बेनामी 20 हजार कोटी रुपये कुणाचे? पंतप्रधान गप्प, काहीच उत्तर नाही. चीनने 2000 स्क्वेअर किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आणि जागांचे नावही बदलले. पण पंतप्रधान गप्प, काहीच उत्तर नाही. पंतप्रधान इतके का घाबरतात, असा सवाल करत त्यांनी मोदींवर टीकास्त्र् सोडले आहे.

तुम्ही भाजप काय म्हणतो तेच का बोलता?
भाजपकडून होणाऱ्या टीकेबद्दल राहुल गांधी यांना मंगळवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर राहुल यांनी ‘तुम्ही नेहमी भाजप काय म्हणतो तेच का बोलता? प्रत्येक केळी तुम्ही भाजप काय म्हणतो तेच बोलता,’ असे प्रत्युत्तर दिले.