हिंदुस्थान-अमेरिका करारामुळे कृषी बाजारपेठांवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडिया–अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारवर टीका केली आहे. “पंजाबमध्ये शेतकरी परिषद बोलवा, तेथील शेतकरी संघटनांशी चर्चा करा आणि हा करार शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की नाही, हे त्यांच्याकडून विचारा,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभेत सोमवारी काँग्रेसच्या आमदारांनी इंडिया–अमेरिका व्यापार कराराविरोधात निदर्शने केली. या कराराला त्यांनी शेतकऱ्यांसाठी “धोका” असल्याचे म्हटले आहे. तसेच, या करारामुळे कृषी बाजारपेठांवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला.

काँग्रेसने केंद्र सरकारवर आरोप केला की, शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता घेतलेले निर्णय त्यांच्या उपजीविकेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे या कराराचा सखोल पुनर्विचार करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.