काँग्रेसची अजून एक उमेदवारी यादी जाहीर, ज्योतिरादित्य शिंदे गुनामधून लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची अजून एक यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 उमेदवारांची नावे आहेत. ज्योतिरादित्य  शिंदे आणि मनिष तिवारी यांच्या नावाचाही या यादीत समावेश आहे.

मुख्यमंत्रीपद हुकलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशमधील  पारंपारिक मतदारसंघ गुनामधून उमेदवारी दिली आहे. तर मनिष तिवारी यांना पंजाबमधील आनंदपूर साहिबमधून उमेदवारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या विदिशामधून काँग्रेसने आमदार शैलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. विदिशा हा सुषमा स्वराज यांचा मतदारसंघ असून भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपने या मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. काँग्रेसने मध्य प्रदेशमधून 3, पंजाब 2 तर बिहार आणि जम्मू कश्मीरमधून प्रत्येकी एक उमेदवार जाहीर केले आहेत.