
भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत खूप फरक आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेशक झाला असून शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून केली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने जेक्हा उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता, याची आठवण करून देत दलवाई यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हका. भाजपचे राजकारण टोकाचे असून मॉब लिंचिंगबाबतच्या त्यांच्या भूमिका चुकीच्या असल्याचे दलवाई यांनी सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.






























































