राम कदमांची पाठराखण, चंद्रकांत दादांकडून ही अपेक्षा नव्हती!

chandrakant-patil-ram-kadam

सामना प्रतिनिधी । नगर

महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप आमदार राम कदम यांची पाठराखण केली आहे. पण चंद्रकांत दादांकडून अशी अपेक्षा नव्हती, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे.

भाजपाचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल जे वक्तव्य केले त्यासंदर्भात भाजपने तात्काळ त्यांना पक्षातून निलंबित केले पाहिजे तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी राफेल मध्ये एक लाख कोटींचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

नगर येथे जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘चंद्रकांत दादा पाटलाकडून कदम यांची पाठराखण झाली हा प्रकार योग्य नाही. या अगोदर सुद्धा चंद्रकांत पाटील अनेकदा वाचाळपणे विधानं केली आहे. जोपर्यंत राम कदम यांना निलंबित करणार नाही, तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. कदमांनी तीन दिवसानंतर माफी मागितली वास्तविक पाहता त्यांनी जाहीर माफी मागायला पाहिजे होती, असेही ते म्हणाले.