
परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मागील दोन महिन्यांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. यामुळे हे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने शिष्यवृत्तीचे पैसे द्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
राज्यातील भाजप महायुती सरकारकडून मागासवर्गीयांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वळविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ परदेशात उच्च शिक्षण घेणाऱयांना दोन महिन्यांपासून शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आली नसल्याचे उघडकीस आले आहे. हे अत्यंत गंभीर असून सरकार जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवत्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला.