
पुलवामा घटनेवर मौन बाळगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आज सोमवारी पंतप्रधान मोदींच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून ‘शर्म करो मोदी शर्म करो’ हे अनोखे आंदोलन राज्यभर पुकारणार आहे.
पुलवामा घटनेने सारा देश हादरला होता. सीआरपीएफच्या 40 जवानांना स्पह्टाने उडवून देण्यात आले. एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षड्यंत्र लपलेले आहे हे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? असे अनेक प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पुलवामा घटनेवर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारची झोप उडवल्याने या मुद्दय़ावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे भाजप सरकारने कितीही प्रयत्न केले तरी जनता त्यांच्या षड्यंत्राला बळी पडणार नाही.
त्यामुळे पुलवामा घटनेचे सत्य बाहेर काढण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारण्यात येणार आहे.




























































