भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर नको ही काँग्रेसच्या आमदारांची इच्छा! विजय वडेट्टीवार

879

राज्यात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये अशी काँग्रेसच्या नव्वद टक्के आमदारांची इच्छा आहे असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील सध्याच्या राजकीय तिढय़ाच्या पार्श्वभूमीवर काही ठोस निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बी-वन या शासकीय निवासस्थानी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, हुसेन दलवाई, अमित देशमुख, विश्वजीत कदम आदी नेते उपस्थित होते.

ही बैठक सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, भाजपचे सरकार येऊ नये असे राज्यातील 90 टक्के आमदारांना वाटते. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठाRशी चर्चा करत आहोत, असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या एका गटाचा वाढता दबाव

राज्यात सत्ता स्थापन करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ अशी काँग्रेस आमदारांची मागणी आहे. त्यादृष्टीने काँग्रेसच्या एका गटाचा मोठा दबाव काँग्रेस पक्षश्रेष्ठाRवर आहे. नवी दिल्लीतल्या नेतृत्वाने बाहेरून पाठिंबा देण्यास नकार दिला तर आपण वेगळा गट स्थापन करून बाहेरून पाठिंबा देऊ असे काँग्रेसमधील एका गटाचे मत असल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या