
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अॅड. जमीर खलिफे यांनी १६४२ मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे अभय मेळेकर यांना १६०८ मते मिळाली. बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सोमवारी मतमोजणी झाली.
हनिफ काझी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी राजापूरात पोटनिवडणूक झाली शिवसेनेकडून अभय मेळेकर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अॅड. जमीर खलिफे, भाजपकडून गोविंद चव्हाण रिंगणात होते. रविवारी शांततेत मतदानातील प्रक्रिया पार पडली. एकूण ६८ टक्के मतदान झाले. आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला.
पहिल्या फेरीपासून अॅड. जमीर खलिफे यांनी आघाडी घेतली. आठ फेऱ्यांअखेर अॅड.जमीर खलिफे यांना ३१५० मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार अभय मेळेकर यांना १६०८ मते मिळाली. भाजपचे उमेदवार गोविंद चव्हाण यांना ४२२ मते मिळाली.

































































