सिल्लोडच्या नगर परिषदेत पुन्हा काँग्रेसची सत्ता; भाजपचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिल्लोड

सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता आली असून भाजपचा पराभव झाला आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या राजश्री राजरत्न निकम या 10 हजार 882 मतांनी विजयी झाल्या, तर नगरसेवकांच्या 26 जागांपैकी काँग्रेसचे 24, भाजपचे 2 जण विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजश्री राजरत्न निकम यांना 19 हजार 563 मते, तर भाजपचे ऍड. अशोक अभिमान तायडे यांना 8 हजार 681 मते पडली. सिल्लोड नगर परिषदेची सत्ता पुन्हा काँग्रेस म्हणजे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे आली आहे. भाजपचे रूपाली मनोज मोरेल्लू व अश्विनी किरण पवार हे दोन उमेदवार निवडून आले आहेत.