गुरुनानक कॉलेजमध्ये संविधान सप्ताह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

गुरुनानक कॉलेजमध्ये राज्य शास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान सप्ताहचे आयोजन नुकतेच करण्यात आले. नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी यासाठी संविधान जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. संविधान सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आधारकार्ड दुरुस्ती शिबीर, पॅनकार्ड शिबीर, विशेष मतदार नोंदणी शिबीर व झीरो बॅलन्स अकाऊंट उघडण्यासाठी शिबिराचे आयोजन केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरविले आहे. 29 नोव्हेंबरपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार असून सप्ताहाची सांगता शांतिवन पनवेल येथील आश्रमशाळेत भेटवस्तू देऊन करण्यात येणार आहे.