
बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल (57) यांनी आज चिंचपोकळी येथे आत्महत्या केली. राहत्या टॉवरच्या 23 व्या मजल्यावरून उडी टाकून त्यांनी आपले आयुष्य संपवले. माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे पारस यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
चिंचपोकळी रेल्वे स्थानकाशेजारील शांतीकमल को. ऑप. हौसिंग सोसायटी या बहुमजली टॉवरमध्ये पारस पोरवाल त्यांच्या कुटुंबीयासह राहत होते. आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील जिमच्या बाल्कनीमधून खाली उडी टाकली. 23 व्या मजल्यावरून खाली पडल्याने पारस यांचा जागीच मृत्यू झाला. जिममध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसून कोणाचीही चौकशी करू नये, असे त्यात लिहिले असल्याचे काळाचौकी पोलिसांनी सांगितले. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.




























































