
सामना प्रतिनिधी । मुंबई
वाढत्या वीज बिलांमुळे राज्यातील औद्योगिक ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सप्टेंबर 2018 पासून झालेली वीज दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राज्यभरातील वीज ग्राहक एकवटले असून बुधवार 3 जुलै रोजी मुंबईत राज्यस्तरीय बैठक होणार आहे.
महावितरणच्या विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने महाराष्ट्रातील उद्योगांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांच्या राज्यस्तरीय समितीने जानेवारीमध्ये राज्यभर वीज बिलांची होळी केली होती तेव्हा सरकारने दरवाढ मागे घेण्याचे अश्वासन दिले होते, मात्र सरकारने अद्याप दरवाढ मागे घेतलेली नाही, ना अनुदान जाहीर केले. त्यामुळे वीज दरवाढ रद्द करण्याबाबत सरकारला जाग आणण्याबरोबरच अंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रत्येक जिह्यातील दोन पदाधिकार्यांची बैठक दुपारी 3 वाजता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर कार्यालय फोर्ट येथे होणार असल्याचे राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी सांगितले.























































