
सामना ऑनलाईन । सातारा
भरधाव वेगात येणाऱ्या एका कंटनेरने धडक दिल्यामुळे सात दुकानांचं नुकसान झाल्याची घटना सातारा-बारामती मार्गावर घडली आहे. येथील पाडेगाव टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला.
शुक्रवारी रात्री पाडेगाव टोलनाक्यावर आलेला एक भरधाव कंटनेर रस्त्या लगतच्या तब्बल सात दुकानांमध्ये घुसला. या कंटेनरमुळे काही व्यावसायिकांची दुकाने जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मागील महिन्यात या टोलनाक्यात कंटेनर घुसला होता. त्यावेळी या टोलनाक्याचे नुकसान झाले होते. अद्याप दुरुस्ती न झाल्याने तुटलेल्या टोलनाक्याच्या छताचा भाग खाली आलेला आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात छताचा भाग अचानक दिसल्याने चालक घाबरला आणि त्याने गाडी डाव्या बाजूला नेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
summary- container hit seven shops near satara























































