ते लोक देशाला इस्लामिक स्टेट बनवू इच्छितात, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

642

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे लोक CAA ला विरोध करत आहेत ते देशाला इस्लामिक स्टेट बनवू इच्छितात असे सिंह म्हणाले आहे. तसेच कलम 370हटवणे आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाल्याने ते लोक रोष व्यक्त करत आहेत असेही सिंह म्हणाले.

बिहारच्या अररिया भागात भाजापची जिल्हा कार्यसमितीची बैठक होती. तेव्हा गिरीराज सिंह म्हणाले की, “आपल्या देशात लोकसंख्येचा स्फोट होत आहे. हे जर आपण वेळीच नाही थांबवले तर याहून भयंकर परिस्थिती निर्माण होईल. यासाठी आमचे सरकार लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा आणणार आहे.

तसेच जे लोक सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत आहेत, त्यांना हा देश इस्लामिक स्टेट बनवायचा आहे असे गिरीराज म्हणाले. कलम 370 हटवणे आणि राम मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला. याचा रोष या आंदोलनाच्या माध्यमातून हे लोक व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी सर्व मुस्लिमांना 1947सालीच पाकिस्तानी पाठवायला हवे होते असे वक्तव्य सिंह यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या