महागाईचा विस्फोट! गॅस 3 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ऑक्टोबर हिटच्या उन्हाच्या झळा लोकांना बसू लागल्या असतानाच रविवारी घरगुती गॅस महागल्याने उन्हाबरोबर आता महागाईच्या झळा लोकांना बसणार आहेत. विनाअनुदानित गॅस प्रत्येकी 60 रुपयांनी तर अनुदानित गॅस प्रत्येकी तीन रुपयांनी वाढवल्याची घोषणा आज करण्यात आली.

त्याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही प्रति किलोलिटर 2650 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 1 किलोलिटर म्हणजे 1000 लिटर या दरवाढीमुळे विमान प्रवासही महागणार आहे. सरकारने नवी दिल्लीत सीएनजीचे दरही वाढवले.

summary- cooking gas rates got rise by 3 rs