
मका-अननस सलाड
साहित्य : 1 कप स्वीट कॉर्न, पाऊण कप हिरवी भोपळी मिरची, पाऊण कप लाल भोपळी मिरची, 2 अननसाचे काप, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे अननसाचा रस, सजावटीसाठी कोथिंबीर, चवीपुरते मीठ, चवीपुरती मिरपूड
कृती : सर्वप्रथम सलाड बनवण्यासाठी कॉर्न एकदा पाण्याखाली धुवून घ्यावा. जर कणीस आणून त्याचे दाणे वापरणार असाल तर पाण्यात थोडे मीठ घालून दाणे शिजवून घ्यावेत. नंतर त्यातील पाणी काढून थंड होऊ द्यावेत. हिरवी आणि लाल भोपळी मिरची कॉर्नच्याच साईजची चिरून घ्यावी. अननसाचे 1 इंचाचे तुकडे कापून घ्यावेत. 4 हिरवी मिरची, कोंिथबीर बारीक चिरून घ्यावी. त्यानंतर चिरलेली भोपळी मिरची, अननस, कॉर्न एकत्र करावेत त्यात लिंबाचा रस, अननसाचा रस, मीठ, मिरची घालून निट मिक्स करावे. सर्व्ह करायच्या आधी वरून मिरपूड भुरभरावी आणि कोथिंबीरीने सजवावे. अननसासोबत मक्याचे सलाड चवीला छान लागते. शिवाय करायलाही सोपे आहे.





























































