कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी बनवले मशरूमने चालणारे रोबोट

मशरूमच्या मुळासारख्या धाग्यांपासून कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दोन रोबोट तयार केले आहेत. शास्त्रज्ञांनी मशरूमच्या मायसेलियमला रोबोटच्या हार्डवेअरशी जोडले. ते इलेक्ट्रोडद्वारे वाचले जाणारे लहान विद्युत सिग्नल तयार करते. हे सिग्नल रोबोटच्या हालचाल करणाऱ्या भागांवर नियंत्रण ठेवतात. रोबोट्सना अल्ट्राव्हायोलेट प्रकाश दाखवला असता त्यांनी त्यांची दिशा आणि हालचाल बदलली. मशरूमला प्रकाश अनुकूल नाही. मशरूमने चालणारे रोबोट कोणत्याही तारांविना चालतात, असे संशोधक रॉबर्ट शेफर्ड सांगतात.