
कोरोनातून बरे झालेले 20 टक्के लोक हे 90 दिवसांत मानसिक आजाराने ग्रस्त झाल्याचे ‘लॅन्सेट सायकााट्रिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये उघड झाले आहे. यामध्ये अमेरिकेतील 69 हजार लोकांनी भाग घेतला. यात त्यांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्याच्या नोंदीचे विश्लेषण केले गेले, ज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या 62 हजारांहून अधिक लोक होते.त्यांच्यातील 5 पैकी 1 व्यक्ती पुढील तीन महिन्यांतच चिंता, नैराश्य किंवा निद्रानाशाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. तसेच वेड लागणे, मेंदू कमपुवत होणे आदि समस्यादेखील आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या आजारासाठी नवीन उपचार पद्धत शोधून त्यावर भर देणे गरजेचे असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
चिंतादेखील प्रतिकारशक्तीवर परिणाम करते
अमेरिकन हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी)च्या मते, आपण सावधगिरी बाळगल्यास काळजी करण्याची गरज नाही. अधिक चिंता करणेदेखील आरोग्यास हानी पोहचवू शकते आणि रोग प्रतिकारशक्ती आणि चयापचय यालाही प्रभावित करू शकते. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
दोन मोठी कारणे
लेखक पॉल हॅरिसन यांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याची चिन्हे दिसण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारे हा विषाणू मानवी मेंदूचे थेट नुकसान करू शकतो.यामुळे लोक मानसिक आजाराचे बळी ठरतात.दुसरे म्हणजे, कोरोना असल्याच्या अनुभवामुळे आणि पोस्ट कोविड सिंड्रोमच्या भीतीमुळे लोक चिंताग्रस्त होऊ शकतात.
तज्ञांचे म्हणणे काय…
किंग्ज का@लेज लंडन येथील मानसोपचारशास्त्र्ााचे प्राध्यापक सायमन वेस्ले रेगस म्हणतात की, या अभ्यासाचे निकाल संसर्गजन्य आजारांमुळे प्राप्त झाले आहेत. कोरोना मध्यवर्ती मज्जासंस्थेस प्रभावित करते, त्यामुळे कमजोर प्रतिकारशक्ती असणाऱया लोकांना त्याचा धोका अधिक असतो.




























































