बीडचा कोरोना पॉझिटिव्ह असलेला आरोपी कळंबमध्ये जेरबंद, चार दिवसानंतर मिळाले यश

994

एका गंभीर आरोपामध्ये अटक करण्यात आलेला आणि कोविड सेंटरमधून फरारा झालेला आरोपी कळंब पोलिसांच्या मदतीने पुन्हा जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले. चार दिवसानंतर त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या चार दिवसात तो आरोपी कुणाच्या संपर्कात आला, त्याचे कॉन्टक्ट ट्रेसिंग केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील एका गंभीर घटनेमध्ये अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले होते. त्याच संपर्कात आलेल्या 55 पोलिसांचे स्वॅब घेण्यात आले होते. या आरोपीला उपचारासाठी बीडच्या कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्या आले होते. त्याच्यावर सहा दिवस उपचार करण्यात आले. कोरोनाचे लक्षणे सौम्य झाल्यानंतर त्यास दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये रेफर करण्यात आले, याच संधीचा फायदा घेऊन त्याने कोविड सेंटरमधून पळ काढला होता.

कोरोनाग्रस्त आरोपी फरार झाल्याने पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्याचा तपास करण्याचे काम सुरु होते. अखेर कळंब पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आरोपी जेरबंद करण्यात यश मिळाले. पोलिस शिपाई जे.जे. वाघमोडे, पी.पी. जाधव यांनी मोबाईलच्या लोकेशनवरुन त्याचा शोध घेतला आणि बीड पोलिसांचे काम हालके केले. शनिवारी दुपारी आडीचच्या सुमारास या आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या