लहान मुलांमधील कोरोना रोखण्यासाठी चौदा बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून बचाव करण्यासाठी माहीमच्या हिंदुजा रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली चौदा बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱया संभाव्य लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा इशारा तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. ही लाट थोपवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील बालरोगतज्ञांना सहभागी करून घेत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली होती. मागील आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने बालरोगतज्ञांसाठी सोशल मीडियावर एक विशेष कार्यक्रम झाला होता. यावेळी राज्यातील सहा हजार बालरोग़तज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने मार्गदर्शन केले. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरांना दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केले होते.

त्यानंतर लहान मुलांमधील कोरोना रोखण्याच्या दृष्टीने उपाय सुचवण्यासाठी डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क पर्ह्स स्थापन करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली चौदा तज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे.

  • टास्क पर्ह्समधील बालरोगतज्ञ डॉक्टर्स
  • डॉ. सुहास प्रभू, हिंदुजा हॉस्पिटल, माहीम
  • डॉ. विजय येवले, संचालक अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डॉ. बकुल पारेख, माजी अध्यक्ष इंडियन
  • अॅपॅडमिक ऑफ पेडियाट्रिशन
  • डॉ. बेला वर्मा, विभागप्रमुख जे. जे. हॉस्पिटल
  • डॉ. सुधा राव, प्रा. जेरबाई वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटल, परळ
  • डॉ. परमानंद आंदणकर, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे
  • डॉ. विनय जोशी, एसआरसीसी हॉस्पिटल, हाजी अली.
  • डॉ. सुषमा सावे, नायर व आर. एन कूपर हॉस्पिटल,
  • डॉ. जितेंद्र गव्हाणे, एमजीएम हॉस्पिटल, पनवेल
  • डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक
  • डॉ. आरती किन्नीकर, प्रा. बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे
  • डॉ. ऋषिकेश ठाकरे, संभाजीनगर,
  • डॉ. आकाश बंग, एम्स हॉस्पिटल, नागपूर
  • वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, संचालक (सदस्य सचिव)