
पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 359 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्णसंख्या 9 हजार 772 इतकी आहे. तर कोरोनाबाधीत 15 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.47 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 3 लाख 59 हजार 773 रुग्णांपैकी 3 लाख 43 हजार 456 रुग्ण बरे होत घरी परतले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 655 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.46 टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 53 हजार 932 रुग्णांपैकी 51 हजार 495 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 686 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 726 रुग्णांपैकी 45 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 701 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 47 हजार 475 रुग्णांपैकी 45 हजार 554 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 194 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 49 हजार 453 रुग्णांपैकी 47 हजार 684 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 699 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 704 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 568 , सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 4 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 887 आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 748, सातारा जिल्ह्यामध्ये 47, सोलापूर जिल्ह्यामध्ये 57, सांगली जिल्ह्यामध्ये 15 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 36 हजार 769 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 59 हजार 359 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
































































