
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या स्थिरावल्याचे समोर आले असून सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांखाली बाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 1815 बाधित आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत आढळलेल्या बाधितांमधील 293 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 68 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसांत 753 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत 22 हजार 185 सक्रिय रुग्ण आहेत.






















































