ठाण्यातील बेघरांना स्टेडियममध्ये मिळाला आसरा

606

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबला पाहिजे यासाठी सर्वच थरातून प्रयत्न सुरू असतानाच ठाणे महानगर पालिकेने देखील आता बेघर असणाऱ्या व्यक्ती ना ताात्पुरता निवारा देण्यासाठी विविध स्टेडियम मध्ये राहण्याची सोय केली आहे.

लॉकडाउनमुळे सर्वजण घरी सुरक्षित असताना बेघरानी कुठे आसरा घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता  रस्त्याच्या बाजूला  राहणाऱ्या व्यक्ती च्या राहण्याची व्यवस्था पालिकेच्या विविध स्टेडियम मध्ये करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या लोकांना परिवहन सेवेच्या गाडीत बसवून स्टेडियम मध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या