कोरोना इफेक्ट; अमेरिकन ओपन स्पर्धा संकटात

221

कोरोनामुळे आता अमेरिकन ओपन ही टेनिस ग्रॅण्ड स्लॅमही संकटात सापडली आहे. विम्बल्डन टेनिस ग्रॅण्ड स्लॅम आधीच रद्द करण्यात आली. फ्रेंच ओपन ग्रॅण्ड स्लॅम ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आलीय. आता 31 ऑगस्टपासून खेळवण्यात येणाऱया अमेरिकन ओपन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकामागोमाग एक असे खेळाडू या स्पर्धेमधून माघार घेऊ लागले आहेत. स्पर्धा आयोजक यावेळी कोणता निर्णय घेताहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिकन ओपन स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत करण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे. मात्र कोरोना, प्रवास, आरोग्य याकडे लक्ष देऊन काही खेळाडूंनी या स्पर्धेमधून माघार घेतली आहे. रफाएल नदाल, ऍश्ले बार्टी, किकी बर्टेन्स, एलिना स्वितोलिना, निक किर्गिओस यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर सर्बियाचा नोवाक जोकोविच व सिमोना हालेपही या स्पर्धेत न खेळण्याचा विचार करीत आहेत. आता या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय आणखी एका टेनिसपटूने घेतला आहे. यावेळी स्वेतलाना कुझनेत्सोवा हिनेही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या