
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशात झपाटय़ाने वाढत असून ती 116 वर पोहचली आहे. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे, तर त्यांच्या संपका&त आलेल्या नागरिकांचा आणि सहप्रवाशांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा नवा स्ट्रेन जगातील शंभर देशांत पोहचला असून ब्रिटनमध्ये तर धुमापूळ घातला आहे. त्यापार्श्वभूमीवर हिंदुस्थानने खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून आलेल्या प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळेच आतापर्यंत नव्या स्ट्रेनची लागण झालेले 116 रुग्ण आढळल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या स्ट्रेनमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याचेही स्पष्ट केले आहे. तर राज्य सरकारलादेखील खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याची सूचना करण्यात आली आहे.





























































