
मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी मुंबईत 189 रुग्ण सापडले. मात्र, आज रुग्णसंख्येत किंचित घट झाली असून दिवसभरात 172 रुग्ण सापडले. यापैकी 160 जणांना कोरोनाची कोणतीच लक्षणे नक्हती. 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 4 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले.
मुंबईत आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, आज दिवसभरात त्यात किंचित घट झाली. दिवसभरात बरे होणार्या रुग्णांची संख्याही काढल्यामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मुंबईत दिवसभरात 123 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती 1 हजार 70 वर पोहोचल्यामुळे चिंता वाढली आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांनी सलग दुसर्यांदा एक हजारचा टप्पा पार केला आहे.
राज्यात 562 नवे रुग्ण
राज्यात आज दिवसभरात 562 रुग्ण सापडले तर 395 जण कोरोनामुक्त झाले तर तिघा जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 24 डिसेंबर 2022 पासून मुंबई, पुणे, नागपूर या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर 16 लाख 63 हजार 26 आंतरराष्ट्रीय प्रवासी दाखल झाले. त्यापैकी 37 हजार 45 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या तर आतापर्यंत 45 प्रवाशांना कोरोना झाल्याचे उघड झाले असून पुढील तपासणीसाठी त्यांचे जनुकीय नमुने पुण्यातील क्हायलॉजिकल लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
आजची रुग्णसंख्या
- राज्य 562
- मुंबई 172
- ठाणे 56
- नवी मुंबई 32
- पुणे 43
- पिंपरी-चिंचवड 22
- संभाजीनगर 21
- नागपूर 25
































































