बीडमध्ये कोरोनाचा प्रवेश; कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात दोनजण पॉझिटिव्ह आढळलेले हे दोघे मुंबई आणि पुण्याहून बीड जिल्ह्यात दाखल झाले होते. कोरोनामुक्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात शनिवार चिंतेत टाकणारा ठरला आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी नमुने पाठवले होते. त्यात दोन जणांचा अहवाल पोझिटिव्ह आला आहे. हे दोघे बाहेरच्या जिल्ह्यातून दाखल झाले होते. एकजण मुंबई व एकजण पुण्यातून आला होता. दोघांनीही परवानगीशिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश केला होता. कोरोनामुक्त असलेल्या बीड जिल्ह्यात आता दोन कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.