
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या खडकीतील 50 वर्षांच्या महिलेचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहराबाहेरील दोन आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तीन अशा पाच जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे. खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या 50 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेवर पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी या महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत पाच जणांचे बळी घेतले आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील दोन आणि शहरातील तिघांचा समावेश आहे.
थेरगाव भागातील एका पुरुषाचा 12 एप्रिल रोजी, निगडीतील एका महिलेचा 20 एप्रिल रोजी, वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा आणि निगडीतील एका पुरुषाचा 24 एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर खडकीतील रहिवासी असलेल्या महिलेचा बुधवारी (दि.29) मृत्यू झाला आहे. पिंपरी महापालिका हद्दीबाहेरील चार जणांना बुधवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 11 वर्षांचा मुलगा आणि 46 वर्षांचा पुरुष तर 5 आणि 11 वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





























































