पुणे विभागात 3 हजार 849 कोरोनाबाधित; 1 हजार 697 जण घरी परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे विभागातील 1 हजार 697 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 849 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 949 आहेत. विभागातील कोरोनाबाधित 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 127 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील 3 हजार 352 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 533 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ॲक्टीव रुग्णसंख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्हयातील 124 कोरोनाबाधित रुग्ण असून 39 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 308 कोरोनाबाधित रुग्ण असून 87 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 200 आहे. कोरोनाबाधित 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 41 कोरोनाबाधित रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 आहे. कोरोनाबाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 24 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 आहे. कोरोनाबाधित एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत विभागामध्ये एकूण 40 हजार 438 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 37 हजार 552 नमुन्यांचा अहवाल मिळाला आहे. तर 2 हजार 876 नमून्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या अहवालांपैकी 33 हजार 654 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 3 हजार 849 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत विभागामधील 1 कोटी 2 लाख 20 हजार 936 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 41 लाख 94 हजार 348 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 635 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.