रत्नागिरीत आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

586

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी पाच कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. हे पाचही रूग्ण मुंबईतून रत्नागिरीत आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 82 झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये चार जण खेड तालुक्यातील कळंबणीचे आणि एक रत्नागिरी तालुक्यातील आहे. तसेच 109 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 69 अहवाल कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील असून उर्वरित 40 अहवाल कामथे उपजिल्हा रुग्णालयातील आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या