
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी तब्बल 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 11 जण मंडणगड तालुक्यातील असून दोनजण खेड तालुक्यातील कळंबणी येथील आहेत. हे सर्वजण मुंबईतून आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 34 वर पोहचली आहे.
शनिवारी सायंकाळी उशिरा मिळालेल्या अहवालानुसार मंडणगड येथे 11 आणि कळंबणी अंतर्गत 2 अशा एकूण 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंडणगड येथे 11 जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व 11 जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे यातील 9 जण पंदेरी या गावातील असून एक म्हाप्रळ व पालवणी एक आहे. कळंबणी अंतर्गत जे २ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्यांना लवेल येथे क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. तसेच आतापर्यंत 413 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.





























































