इतर जिल्ह्यातून आलेल्यांमुळे कोरोनाचा फैलाव; लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 93वर

561

लातूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून, परप्रातांमधून प्रवास करुन आलेल्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाला आहे. या प्रवाशांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 93 वर गेली असून 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात कोणत्याही परवानगी आणि आरोग्य तपासणीशिवाय आलेल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे 12 जण हरियाणामधून आले होते. त्यातील 8 जण कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले होते. मरकजमधून ते आल्याचे स्पष्ट झाले होते. ते गुपचूप जिल्ह्यात दाखल झाले होते. जिल्ह्याच्या सीमा बंद असूनही लपूनछपून आणि परवानगीशिवाय जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली, त्यामुळे कोरोनाबाधितांचीही संख्या वाढली. आता जिल्ह्याबाहेर गेलेले जवळपास सर्वजण जिल्ह्यात परतले आहेत. त्यातील विनापरवानगी आलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जिल्ह्यात एकून 93 कोरोनाबाधित आह. त्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे 3 जणांची मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 47 जण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या