…तर तिसरी कसोटीही मेलबर्नला होणार, सिडनीतील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी मेलबर्नला, तिसरी कसोटी सिडनीला आणि चौथी कसोटी ब्रिस्बेनला होणार आहे. पण सिडनी येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे दोन देशांमधील क्रिकेट मालिकेच्या वेळापत्रकात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. मेलबर्न येथे दुसरी कसोटी होणार असून तिसरी कसोटीही तेथेच खेळवण्याचा पर्याय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठेवला आहे.

सिडनी येथील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरही ही समस्या सुटणार नाही.  सिडनी येथील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे तेथून ब्रिस्बेनला येणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे दोन देशांचे क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ व कसोटीशी संबंधित इतर व्यक्तींना ब्रिस्बेन येथे जाता येणार नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मेलबर्न येथेच तिसरा कसोटी सामना खेळवण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे.

दुसऱया कसोटीदरम्यान होणार अंतिम निर्णय

सध्या उर्वरित कसोटी नियोजित वेळापत्रकानुसार खेळवण्यात याव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पण याबाबतचा अंतिम निर्णय बॉक्सिंग डे अर्थात मेलबर्न येथे होणाऱया दुसऱया कसोटीदरम्यान घेण्यात येणार आहे, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून यावेळी देण्यात आली.