कोरोनामुक्त झालेल्यांना जाणवतायत पचन विकाराच्या समस्या

कोरोनाच्या संसर्गातून बऱया झालेल्या अनेक रुग्णांना गुलियन बॅरे सिंड्रोम, फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदय किंवा मूत्रपिंडातील समस्या, रक्तवाहिन्यांत गुठळय़ा होणे, न्यूमोनिया आणि अगदी अशक्तपणा यासारख्या अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे ओपीडीत येणाऱया रुग्णांत दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात हे पचन क्रियेसंबंधीत विकारांचे आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असून मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरावर कशाप्रकारे परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात आला होता. कोरानामुक्त झालेल्यांवर दीर्घकालीन परिणामांमध्ये पचनसंस्थेसंबंधीत विकारदेखील उद्भवू शकतात असे निदर्शनास आले आहे. याशिवाय बऱयाच रूग्णांना भूक न लागणे किंवा भूक वाढणे, ओटीपोटात दुखणे, आंबटपणा, अतिसार आणि उलटय़ा यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय. योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. औषधोपचाराने या विकारांवर मात करता येऊ शकते असे चेंबूरच्या झेन हॉस्पिटलमधील पोटविकार तज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या