रत्नागिरीत आणखी सात रुग्ण सापडले

शुक्रवारी रात्री उशीरा मिरज येथून 455 तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 448 अहवाल आले निगेटिव्ह असून 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सात नव्या कोरोनाबाधित रूग्णांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 132 झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात गुहागर, दापोली आणि रत्नागिरीतील प्रत्येकी दोन रूग्ण तर संगमेश्वर येथील एका रूग्णांचा समावेश आहे. यापैकी 91 रूग्ण उपचार घेत असून उपचारानंतर 37 जणांना घरी सोडण्यात आले. तसेच जिल्ह्यात चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या