
मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून रुग्णवाढ दुपटीचा कालावधी आज 61 दिवसांवर पोहोचला आहे. यामध्ये एच पूर्व म्हणजेच वांद्रे पूर्व विभागात 126 दिवसांचा सर्वाधिक कालावधी नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईत सरासरी रुग्णवाढही 1.14 पर्यंत खाली आली आहे.
धारावी, वरळीसारख्या कोरोना हॉटस्पॉमध्ये कोरोना नियंत्रणात आल्यानंतर गेल्या काही दिवसांत रुग्णवाढ झपाट्याने होणार्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंडमध्येही रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. यामध्ये दहिसर 46 दिवस, बोरिवलीत 32 दिवस, कांदिवली 38 दिवस आणि मुलुंडमध्ये डबलिंग रेट 48 दिवस झाला आहे.
मुंबईत 22 जुलैपर्यंत एकूण 4 लाख 50 हजार 459 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 104572 कोरोनाबाधित आढळले असून 75 हजार 118 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आता 23 हजार 582 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 71 टक्क्यांवर पोहोचले आहे. मुंबईत प्रतिदिन होणार्या पाच हजार चाचण्यांचे प्रमाण आता आठ हजारांवर गेले आहे. त्यामुळे रुग्णांचा शोध मोठ्या प्रमाणात घेतला जात असून निकट संपर्कातील व्यक्तींचे प्रभावी क्वारेंटाइन केल्यामुळे रुग्णसंख्याही आटोक्यात आहे.




























































