कोरोनाबाबत मोठा दिलासा; देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला, मत्यूदरात घट

642

देशात झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या हा चिंतेचा विषय असला तरी कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेटही वाढल्याने दिलासा मिळाला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 70 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. तर मृत्यूदरात घट झाली आहे. गतीमान तपासण्या, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आणि रुग्णांवर उपाचार यामुळे कोरोनावर मोठे यश मिळाले आहे. अॅम्बुलन्स सेवा, रुग्णांची देखभाल आणि योग्य व्यवस्था आणि कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने राबवलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाविरोधातील लढाईला यश आल्याचे सरकारने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 70 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. आतापर्यंत 69.33 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. तसेच कोरोनाबाधितांचा मृत्यूदरही घटला आहे. कोरोनाबाधितांमध्ये 2 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना देशातील 10 राज्यातच मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. म्हणजे इतर राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आल्याने आणखी एक दिलासा मिळाला आहे. देशातील 10 राज्यात 80 टक्के नवे रुग्ण आढळत असल्याने इतर राज्यात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. रिकव्हरी रेट वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आता 28.66 टक्के अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण आहे. सध्या देशात 6 लाख 34 हजार 945 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. देशातील कोरोना लॅब आणि कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या