राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.49 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आज 3,001 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण 16,18,380 काेरोनाबाधित रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.49 % एवढे झाले आहे. 2,535 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 60 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. राज्यात 7,48,226 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,395 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.