‘कोरोना’वरील शोधनिबंधाची इटली इंटरनॅशनल चेस्ट कॉन्फरन्स मध्ये निवड, मालवणातील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरची अभिमानास्पद कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. विवेक रेडकर, डॉ. सागर रेडकर आणि रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ‘कोरोना संशोधनाचा शोध’ ह्या शोध प्रबधांची इटलीत होणा-या आतंराष्ट्रीय कॉन्स्फरनस मध्ये निवड झाली आहे. ‘व्हाईस पोस्टर’ प्रेझेंटंशन द्वारा २६ जून २०२० रोजी इटलीमधील चेस्ट कॉन्स्फरन्स मध्ये शोध प्रबंध सादर केला जाणार आहे. कोकण व गोवा विभागातून कोरोना संदर्भात निवड झालेला हा पहिला शोध प्रबंध ठरला आहे.

शोध प्रबंध बाबत डॉ. विवेक रेडकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सिंधुदुर्गातील रेडी बंदरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चrन मधून एक प्रचंड मोठे मालवाहू जहाज दाखल झाले. रेडी माईन मधून सामान नेणा-या ह्या बोटीवर बरेच चीनी खलाशी होते. त्यावेळी पी.पी.ई. किट सारखे कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना रेडकर हॉस्पिटलचे मेडीकल ऑफिसर डॉ. मोहन जगताप यांनी फक्त मास्क लावून हे पेशंट तपासले. सुदैवाने हे जहाज २ महिने समुद्रात मार्गक्रमण करत होते व एकही चीनी माणसाला कोरोना लक्षण नव्हते, त्यामुळे पुढील धोका टळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा आजार आलाच, तर हया आजारावर चीनमध्ये मध्ये नक्की काय संशोधन झाले आहे. कुठल्या संशोधनाला चीनला यश आले आहे, यावर हा शोधनिबंध आहे असे डॉक्टर रेडकर यांनी सांगितले

चीन देत असलेल्या उपचाराच्या सगळ्याच संशोधनाच्या निकालाचा त्यानी अभ्यास केला. चीनचे बरेच लोक इटलीत असल्याने व इटलीतील बहुसंख्य लोक मृत्युमुखी पडत असल्याने, शोध प्रबंध ‘इटली चेस्ट कॉन्फरन्स’ मध्ये सादर केला. आम्ही फेब्रुवारीत, संशोधनावर काढलेले हे निष्कर्ष 4 महिन्यानंतर देखील तंतोतंत खरे ठरल्याने सदर रिसर्च पेपरची निवड झाली आहे. कोरोनाची भारतातील पहिलीच लाट अजून चालू आहे. ‘कोरोना’ आजार हा सप्तरंगी असून भविष्यात प्रतिबंधात्मक (immunisation) लस येण्यासाठी बराच कालावधी लोटेल तोपर्यंत कोरोना सात प्रकारे पेशंटला त्रास देईल. असेही डॉ रेडकर यांनी सांगितले.

पहिल्या प्रकारात साधे व्हायरल माईल्ड इन्फेक्शन 
सर्दी खोकला होऊन ८० टक्के लोक त्यांना न कळताच बरे होवून जातील. दुसऱ्या प्रकारात १५ टक्के लोकांना किरकोळ लक्षणे येतील, ताप, सुका खोकला, दम, वास व आंबट सोडून इतर चव जाणे ,हे सर्व पेशंट देखील ट्रीटमेंटने १००%बरे होतील. त्याच्यांतल्या काही पेशंटमध्ये व्हायरस असून देखील तो बॅक्टेरीया सारखा वागेल. सिरम कॅलसिटोनीन वाढेल, आयव्हर मॅक्टीन व डॉक्सी सायक्लीन, अॅझिथ्रोमायसीन HCQ सारख्या औषधाने तो बरा होईल. पण ही ओषधे डॉक्टरांच्या सल्यानीच घेणे आवश्यक आहे. उरलेल ५ टक्के पेशंटच ICU त Admit केले जातील.

तिसऱ्या प्रकारात आयसीयूमध्ये हा व्हायरस कधी कधी एच आय व्ही सारखा वागतो, रोगप्रतीकार पेशीवर हल्ला करतो, Lymphocyte नावाच्या पांढऱ्या पेशी कमी करतो. असे पेशंट मग HIV वर वापरात असणारे लोपीनॅवीर व रिटोनॅवीर औषधाने मल्टीप्लाय व्हायचाच थांबतो. असे पेशंट सिरीअस होवून दगावण्याची शक्यता असते. सध्या आलेले रॅमसेडीवीर हे औषध दिल्यास हे पेशंट लवकर बरे होतात.

चौथ्या प्रकारात थ्रोम्बोइन्फलमेटरी- काही पेशंटमध्ये व्हेंटीलेटरचा उपयोगच होत नाही. कारण हे व्हायरस रक्तात जावून रक्त गोठवतात त्याच्या गुठळया करतात मग अॅस्पीरीन, स्टॅटिन व रक्त पातळ करणारे लो मॉलेक्युलर वेट हिपॅरिन ही इंजेक्शन ICU त दयावी लागतात व हे पेशंट हार्ट अटॅकने दगावतात. त्यांना सतत 100 टक्के ऑक्सिजन (high flow ) द्य़ावा लागतो.

पाचव्या प्रकारात इम्युनो इन्फ्लमेटरी- काही पेशंटची रोगप्रतीकार शक्ती हया व्हायरसला एवढा विरोध करतात कि शरीरामध्ये Cytokine -storm (वादळ) येते. पेशंट अचानक अत्यंत सिरीअस होतो. असे पेशंट Dexamethasone हया जनरल प्रॅक्टीशनर वापरत असलेल्या इंजेक्शनने बरे होतात. मेथीलीप्रेडनिसोलोन ड्रीप वापरल्यास हे वादळ थांबेल.

सहाव्या प्रकारात काही पेशंटमध्ये हॅपी हायपॉक्सीया
(Silent Hypoxia) होतो. म्हणजेच शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण 92 टक्यापेक्षा कमी होते. पण कार्बनडाय ऑक्साईड चे प्रमाण नॉर्मल रहाते. असे पेशंट म्हणजे लिव्हींग डेड बॉडी असतात. कॉन्सट्रेटेड ऑक्सीजन दिला नाही तर तो अगदी पहिल्या 24 तासात दगावू शकतो. अगदी असेच पेशंट चीनमध्ये हॉस्पिटल बाहेरच मृत पावले. आपण त्यांचे भयानक व्हीडिओ बघितले व मनातून घाबरलो. पण आता हा आजार साध्या पल्स ऑक्सीमिटर या मशीनवर देखील अगोदर ओळखू येतो. शरिरातील ऑक्सिजन साठा 92 टक्क्यांपेक्षा कमी आल्यास त्या पेशंटसाठी परिस्थिती चिंताजनक बनू शकते आणि म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते.

सातव्या प्रकारात एआरडीएस म्हणजे कृत्रिम श्वसनयंत्रावर (व्हेंटिलेटर) ठेवले जाणारे 5 टक्के पेशंट पैकी 2 टक्के वाचतात. फुप्फुसांना होणारा हा एआरडीएस आजार पेशंटला कितीही ऑक्सिजन दिला परिणाम करू देत नाही. हा विषाणू शरिरात मोठ्या प्रमाणात फैलावल्याने फुप्फुसात ऑक्सिजन व कॉर्बनडाय ऑक्साईडची देवाण घेवाणच करु देत नाही. यामुळे व्हेंटीलेटरवरील 50 टक्के पेशंट दगावू शकतात.

चीन देशाने कोरोना पेशंटवरील सप्तरंगी हल्याचे संशोधन जानेवारीतच केले होते. इटलीला फेब्रुवारीमध्ये रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ने पाठवलेल्या या पेपर मध्ये प्रत्येक सिरीअस पेशटला स्टेरॉइडस, अॅन्टी व्हायरस व अॅन्टी एचआयव्ही औषधाचा फायदा होईल हे भाकित ह्या शोध निबंधात होते. भारत सरकारने केलेल्या योग्य वेळीच्या लॉकडाऊन मुळे मोठी आपत्ती टळली. कारण कोरोना जगभर कसा वागतो व काय औषध घ्यायचे हयाचे बरेच संशोधन गेल्या चार महिन्यात झाले. त्याचा भारताला आता नक्कीच फायदा झाला. खरे तर हा व्हायरसचा नाश करण्यासाठी लस किंवा औषध उपलब्ध नाही. जनतेने मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे हे किमान उपाय केलेच पाहिजेत.

डॉ. रेडकर हयांचा हा पेपर 26 जून रोजी या लिंकवर क्लिक केल्यास वाचता येईल. व्यक्तीशः रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरने ट्रिटमेंट बाबत कुठलाही नवीन शोध केलेला नाही. आज जगात जी उपचार पद्धती आहे व ती कुठल्या वैयक्तीक निकषावर घ्यावी हयाचा हया पेपरमध्ये उहापोह केला. त्याला ईटली देशाच्याच चेस्ट कॉन्फरन्सने मान्यता दिली आहे.

शेवटी कोरोना होईल म्हणून प्रचंड काळजी घ्या. पण झालाच तर बिलकुल काळजी करु नका अगदी मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणीही अत्याधुनिक औषधामुळे डेथ रेट १० टक्के वरुन २ टक्के वर आला आहे.आता तर स्टिरॉइड औषधाने तो १ टक्क्यावर येईल. असाही विश्वास डॉ रेडकर यांनी व्यक्त केला.

जागतिक आरोग्य संघटनेतल्या २००४ साठी एच आय व्हीं कॉन्फरनस मध्ये निवड झालेल्या स्वतःच्या रिसर्च पेपरर्स प्रणालीचा आपल्याला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर सदर शोध प्रबंध साठी जागतिक आरोग्य संघटनेचे भुतपूर्व डायरेक्टर गुरुवर्य डॉ.बी.बी.गायतोंडे (बांदा), डॉक्तर फॅटर्निटी क्लब, आय एम ए. सिंधुदुर्ग, मालवण व वेंगुर्ला मेडीकल असोसिएशनचे सहकार्य लाभले. अशी माहिती रविकिरण चिंतामणी तोरसकर, विश्वस्त, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांनी दिली आहे.