कोरोना तपासणीसाठी लॅबच्या संख्येत वाढ, आता 116 ठिकाणी होणार चाचण्या

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 100 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची देशातली संख्या 400वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत सात जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारतर्फे 10 राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचसोबत देशभरात नवीन 116 लॅब्सवर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशभरात 89 ठिकाणीच कोरोना चाचणी होत होती. पण, आता हीच संख्या वाढून 116 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याखेरीज 6 खासगी क्लिनिकनाही तपासणीची परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात थायरोकेअर, सबर्बन डायग्नोस्टिक्स, मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड आणि एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल या चार ठिकाणी कोरोना चाचणी होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या