1 सप्टेंबरला केंद्र सरकार वाजवणार शाळेची घंटा, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना

978

‘अनलॉक’च्या पुढील टप्प्यात 1 सप्टेंबरपासून केंद्र सरकार शाळेची घंटा वाजविण्याच्या तयारीत आहे. अर्थात टप्प्याटप्प्याने 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात शाळेचे वर्ग सुरु होतील. पहिल्या टप्प्यांत 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु करण्याचा विचार आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकारांनी अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे स्पष्ट केंद्राकडून करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि 23 मार्चपासून संपुर्ण देशभरातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले. विद्याथ्र्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहेत. देशाच्या अनेक भागात कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही. या पाश्र्वभूमिवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शाळा कशा पद्धतीने सुरु करायच्या यावर चर्चा झाली.

दोन शिफ्टमध्ये शाळेचे वर्ग भरतील. पहिली शिफ्ट सकाळी आठ ते अकरा असेल. दुसरी शिफ्ट दुपारी बारा ते तीन असणार आहे. स्वित्झर्लंड, हाँगकाँगसह काही देशांमध्ये शाळा सुरु झाल्या आहेत. त्या मॉडेलचा अभ्यास सरकारने केल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन शिफ्टमध्ये एक तासाचा वेळ सॅनेटायजेशनसाठी असेल.

राज्याच्या भूमिकेकडे लक्ष
केंद्र सरकारने 31 ऑगस्टला शाळा सुरु करण्याबाबतच्या गाईडलाईन्स जाहीर केल्यास राज्य सरकारची भूमिका काय असेल याकडे पालकांचे आणि विद्याथ्र्यांचे लक्ष लागले आहे. अर्थात कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकारांनी याबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असे केंद्राचे म्हणणे आहे.

पालकांची तयारी नाही
जुलै महिन्यात शिक्षण विभागाने घेतलेल्या सर्वेक्षणाचा सहभाग असेल. या सव्र्हेमध्ये पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्याथ्र्यांना त्रास सहन करावा लागत आहे याकडे राज्य सरकारांनी केंद्राचे लक्ष वेधले होते.

आपली प्रतिक्रिया द्या