
शिवसेनेच्या पाठपुराव्याने आणि पालिकेच्या माध्यमातून चारकोपमध्ये नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हजारो रहिवाशांची सोय होणाऱया या लसीकरण केंद्राचे लोकार्पण आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे.
कांदिवली पश्चिम चारकोप पालिका दवाखाना सेक्टर-1 येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी स्थानिक नगरसेविका शुभदा गुढेकर यांच्या वतीने पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदनही देण्यात आले होते. शाखाप्रमुख निखिल गुढेकर यांनीदेखील या लसीकरण केंद्रासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यानुसार आज हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. लसीकरण केंद्राच्या शुभारंभप्रसंगी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक मनाली चौकीदार, विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभागप्रमुख राजू खान, शाखाप्रमुख निखिल गुढेकर, दीपक शिंदे, शशांक चौकीदार, राधा दळवी, शिल्पा गुरव, वैशाली पावसकर, अभिषेक शिर्के आदी उपस्थित होते.



























































