हिंदुस्थानात स्पुतनिक व्ही लसीचे 10 कोटी डोस बनणार; हेटेरोशी करार

जगासह देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यातच एक दिलासा देणारे वृत्त आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही या लसीचे 10 कोटी डोस हिंदुस्थानात बनवण्यात येणार आहेत. रशियातील औषध कंपनी हेटेरोशी याबाबतचा करार करण्यात आला आहे. या कराराबाबत रशियाच्या सावरेने वेल्थ फंडने माहिती दिली आहे.

हेटेरोने हिंदुस्थानात स्पुतनिक व्ही लसीचे 10 कोटी डोस बनवण्यास सहमती दर्शवली आहे. या लसीचे उत्पादन 2021 मध्ये सुरू करण्यात येणार आहे. वर्षभरात लसीचे 10 कोटी डोस बनवण्यात येणार आहेत. सध्या या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या बेलारूस, युएई, व्हेनेझुअला आणि इतर देशात सुरू आहेत. हिंदुस्थात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असल्याचे आरडीआयएफने सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड आणि अॅस्टाजेनकाची लस चाचणीत 60 ते 70 टक्के यशस्वी ठरली असून ती प्रभावी असल्याचा दावा सिरमने केला आहे. तसेच गुजरातच्या अहमदाबादमध्ये कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनावरील लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना लसीबाबत दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या