जगात हिंदुस्थानात कोविशील्ड सर्वात महाग, युरोपमध्ये दर सर्वात कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 मे पासून 18 वर्षाहून अधिक वय असेलेल्या नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. ऑक्सफोर्डने विकसित केलेली लस 600 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच हिंदुस्थानात या लसीची किंमत 8 डॉलर इतकी आहे.

जगात सर्वात महाग लस हिंदुस्थानात मिळणार आहे. इंग्लंडमध्ये या लसीची किंमत 3 डॉलर तर अमेरिकेत या डॉलरची किंमत 4 डॉलर इतकी आहे. सौदी अरब आणि दक्षिण आफ्रिकेत या लसीची किंमत सव्वा 5 डॉलर इतकी आहे. तर युरोपच्या अनेक देशात या लसीची किंमत केवळ 2.15 डॉलर इतकी आहे.

सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी सरकारसाठी एक डोसची किंमत 200 तर खासगी वितरणासाठी एक हजार रुपये इतकी ठेवली होती.  आगामी काळात सरकारी रुग्णालयातही कोरोनाची लस सशुल्क मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या लसीची किंमत दोनशेहून चारशे रुपये केली आहे. जर राज्यांनी लसीचा आर्थिक भार उचलण्यास नकार दिला तर नागरिकांना आपल्या खिशातील पैसे देऊन लस घ्यावी लागेल. सध्या तरी बहुतांश राज्य मोफत लस देत आहेत.