
कोरोना संकटातून बाहेर निघण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ यावरील लस शोधण्याचे काम करत आहेत. एखाद्या आजारावरील लस शोधण्यासाठी इतक्या गतीने जगभरातील शास्त्रज्ञ काम करत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, अमेरिका, ब्रिटेनसारख्या देशांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र लस घेतल्यानंतर शरीरावर अनेक साईड ईफेक्ट होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याबाबत डॉक्टर्स तसेच आरोग्य विषयक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ही लस घेल्यानंतर होणाऱ्या काही ईफेक्ट्स बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत, ज्यावर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
ताप आणि थंडी
मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लस एका स्वयंसेवकाला टोचल्यानंतर त्याला ताप आणि अंगात हुडहुडी भरल्याचे आढळून आले. लस टोचल्यानंतर काही तासांनंतर त्या व्यक्तीस 102 डिग्री सेल्सियसपर्यंत ताप भरल्याचे लक्षण समोर आले. बर्याच वेळा लस घेतल्यानंतर अँन्टीबॉडी तयार करत असताना सौम्य किंवा जास्त ताप येऊ शकतो.
डोकेदुखी
कोरोन लस घेतल्यानंतर डोकेदुखी, मानसिक तणाव आणि चिडचिडपणा अशा समस्या निर्माण होऊ शकतात. कोणत्याही प्रकारची लस घेतल्यांतर 50 टक्के रुग्णांना या समस्या जाणवतात. या सर्व समस्यांना सामोरे जाण्यास नागरिकांना स्व:तची मानसिक तयारी करावी लागेल.
उल्टी आणि मळमळ
कोणतीही लस घेतल्यानंतर त्याचा परिणाम शरीरातील ग्रॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टिमवर होऊ शकतो. कोरोना लस घेतल्यानंतर उल्टी आणि मळमळ असे साईड ईफेक्ट जाणवू शकतात. ‘आज तक’ च्या वृत्तानुसार, मॉडर्ना लसीची सर्वाधिक मात्रा देण्यासाठी एका स्वयंसेवकाची निवड करण्यात आली होती. या स्वयंसेवकाला ही लस दिल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यात उल्टी, मळमळ, घबराट अशी लक्षणं दिसली.

























































